दोन वर्षांत ३ हजार लोकांना नोकरी

अतारांकित प्रश्नाला कामगार मंत्र्यांचे लेखी उत्तर


23rd February 2018, 03:43 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात मिळून १ लाख २४ हजार ५८२ युवकांनी रोजगार विनीमय केंद्रात नोंदणी केली आहे. तर मागील दोन वर्षात ३०७२ युवकांची सरकारी खात्यात तसेच खासगी कंपनीत नोकरी मिळाली असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्री रोहन खंवटे यांनी   लेखी उत्तरात दिली. या प्रकरणी ताळगावच्या आमदार जेनिफर मॉन्सेरात यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.                         

उत्तर गोव्यात ४२,४५१ पुरुषांनी तर ३५,८६९ महिलांनी नोंदणी केली आहे. दक्षिण गोव्यात २३,३६० पुरुषांनी तर २२,९०२ महिलांनी असे एकूण १ लाख २४ हजार ५८२ युवकांनी रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी केली आहे. 

रोजगार विनीमय केंद्रात नोंदणी झालेल्यांपैकी २०१६ साली १,३६४ जणांना सरकारी नोकरी, तर ३४६ जणांना खासगी कंपनीत नोकरी मिळाली आहे. 

२०१७ साली १०९८ जणांना सरकारी व २६४ जणांना खासगी कंपनीत नोकरी मिळाली असल्याची माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.     

पाच वर्षांत १ लाख जणांची रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी

राज्यात मागील पाच वर्षांत १ लाख ७ हजार २२२ जणांनी रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत नोंदणी करूनही नोकरी मिळू न शकलेल्यांची संख्या १ लाख २४ हजार ५८२ आहे, अशी माहिती कामगार व रोजगार मंत्री रोहन खंवटे यांनी   लेखी उत्तरात दिली. या विषयीचा अतारांकित प्रश्न थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत विचारला होता.

राज्यात आत्तापर्यंत ६५,८११ पुरुष आणि ५८,७७१ महिलांनी मिळून १ लाख २४ हजार ५८२ युवकांनी रोजगार विनीमय केंद्रात नोंदणी केली आहे. रोजगार विनिमय केंद्रात २०१३ मध्ये २१,४९२, २०१४ मध्ये २१,९४५, २०१५ मध्ये १८,९२१, २०१६ मध्ये २४,५०३ आणि २०१७ मध्ये २०,३६१ जणांनी नोंदणी केली असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.     

रोजगार विनिमय केंद्रातील नोंदणी

शैक्षणिक पात्रता पुरुष महिला एकूण             

पीएचडी १० २७ ३७            

पदव्युत्तर पदवी १,९४८ ५,१३४ ७,०८२            

पदवी १४,०४२ २७,२६२ ४१,३०४            

बारावी उत्तीर्ण २१,०७८ २९,०४९ ५०,१२७            

दहावी उत्तीर्ण १९,७७५ १०,९३२ ३०,७०७