दोन दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचा वेळ घेतो

धनगर एसटी प्रश्नी समाज कल्याण मंत्र्यांचे आश्वासन


23rd February 2018, 02:41 am
दोन दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचा वेळ घेतो

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : गोव्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. येत्या दोन दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचा वेळ घेतो, त्यानंतर लवकरच सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेऊ, अशी ग्वाही समाज कल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी दिली.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. गाकुवेध मधील गावडा, कुणबी आणि वेळीप या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला, मात्र धनगर समाजाला त्यापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली.      

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रश्न ठरावाच्या माध्यमातून यायला हवा होता; परंतु वेळ नसल्याने शून्य तासात आला आहे. धनगर समाजाच्या एसटी प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा करून केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांत वेळ मागून घेतो. त्यानंतर कवळेकर यांच्यासह धनगर समाजाचे शिष्टमंडळ दिल्लीला नेऊन या विषयावर चर्चा करू, असे मडकईकर यांनी सांगितले.