बिस्मार्क मृत्यू प्रकरणी सुनावणी तहकूब

फेरतपास करण्याचा आदेश


11th August 2017, 04:51 am

पणजी : सामाजिक कार्यकर्ता बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुन्हा अन्वेषण विभागाला खुनाचा गुन्हा दाखल करून फेरतपास करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी विभागाने खुनाचा गुन्हा दाखल करून खंडपीठात गुरुवारी स्थिती अहवाल सादर केला. खंडपीठाने अहवाल स्वीकारून पुढील सुनावणी १२ आठवड्यासाठी तहकूब केली आहे. सामाजिक कार्यकर्ता बिस्मार्क हे दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी स्थानिक युवकांना घेऊन सांतइस्तेव येथील बाबर बांध येथे फिरण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. बिस्मार्क बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी जुने गोवा पोलिस स्थानकात दिली होती. त्यानंतर त्यांचा ७ नोव्हेंबर रोजी सांतइस्तेव खाडीत मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक गुन्हा दाखल करून गुन्हा अन्वेषण विभागाने तपास करून प्रकरण बंद केले होते. या प्रकरणी डायस याचे हितचिंतकांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठात वरील निर्देश दिले आहे.