Update
   शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा : सोपटे   काँग्रेस कार्यकर्त्यांना सिद्धार्थ, नाईक यांच्याकडून धक्काबुक्की   हरी गावडेंनी बालवयातच घेतले मूर्तिकलेचे धडे   आंबिये कॉलेजमध्ये विद्यार्थी मंडळाचा शपथविधी

पणजी फेरीजवळ गांजा जप्त

एका युवकाला अटक

11th August 2017, 04:50 Hrs

पणजी : येथील फेरी धक्क्याजवळ पणजी पोलिसांनी छापा घालून अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एका युवकाला अटक करून त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचा ९१० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचरांच्या माहितीवरून दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता ते सायं. ५ वाजता दरम्यान फेरी धक्क्याजवळ सापळा रचून छापा घातला. यावेळी पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीचा ९१० ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच पथकाने दुर्गावाडी - ताळगाव येथे राहणारा सुरेश विठ्ठल केसरकर (२७) याला अटक केली. केसरकर याला पोलिस कोठडीसाठी शुक्रवारी पणजी प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ कायदा १९८५च्या कलम २२(बी) आयआय (बी) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक विजय चोडणकर पुढील तपास करीत आहेत.

Top News

वास्कोत दुचाकीचोर गजाआड

स्कूटर जप्त, वास्को पोलिसांची कारवाई Read more

भाजप कार्यकर्त्यांनी संयम राखला

मोठ्या विजयाची पर्रीकरांना अपेक्षा, काँग्रेसकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा Read more

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २०० रुपयांची नोट

छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी ठरणार उपयुक्त Read more

टपाल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पाच दिवसांचा आठवडा, कर्मचारी भरती व इतर मागण्या प्रलंबित Read more