रिवण येथे घरगुती गॅसची विक्री करताना छापा

 ३७ गॅस सिलिंडरमध्ये वजनापेक्षा कमी गॅस असल्याची माहिती

11th August 2017, 04:50 Hrs


वार्ताहर
गोवन वार्ता
सावर्डे : सांगे येथे घरगुती गॅस विक्री करणाऱ्या एकमेव साई गॅस एजन्सीवर नागरीपुरवठा खाते आणि वजनमाप खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानक रिवण येथे गॅसची विक्री करताना छापा घातला. यावेळी ३७ गॅस सिलिंडरमध्ये वजनापेक्षा कमी गॅस सापडला असल्याची माहिती सांगे नागरीपुरवठा खात्याचे निरीक्षक साखरदांडे यांनी दिली.
या प्रकरणी कमी असलेल्या गॅसचा अहवाल संचालकांकडे पाठवला असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असून यापुढे घरगुती गॅस सिलिंडर हाॅटेलमध्ये सापडल्यास त्यावर छापा टाकून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
नागरी पुरवठा अधिकारी साखरदांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात गॅस चोरी करण्याच्या घटनामुळे अनेक नागरिकांची झोप उडाली होती. मडगाव येथे घरगुती गॅसची चोरी करून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरताना रंगेहाथ पकडले होते. त्यानुसार नागरी पुरवठा संचालकातर्फे सर्व गॅस एजन्सीवर छापा टाकण्याचा आदेश देण्यात आला होता.
त्या आदेशानुसार नागरीपुरवठा सांगेचे अधिकारी साखरदांडे वजनमाप खात्याचे सुबर्ट डिकॉस्ता, एचपीचे मॅनेजर वैभव भगत यांनी सांगे येथील साई गॅस एजन्सीच्या गाडीवर पाळत ठेवली होती.
दरम्यान रिवण, सांगे येथे नागरिकांना गॅस पुरवठा करताना या एजन्सीच्या गाडीवर अचानक छापा घातला व गाडीतील प्रत्येक सिलिंडरचे वजन केले असता त्यांना ३७ घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कमी गॅस मिळाल्याची माहिती साखरदांडे यांनी दिली.
या प्रकरणाचा अहवाल तयार केला असून तो नागरीपुरवठा खात्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवला असून या पुढे घरगुती गॅस सिलिंडर हाॅटेलमध्ये सापडल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे साखरदांडे यांनी सांगितले.

Related news

दक्षिण गोवा पोलिसांकडून १,२५३ पैकी १,०५४ प्रकरणांचा छडा

२०१७ मध्ये पोलिसांची यशस्वी कामगिरी : पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांची माहिती Read more

वास्कोत चोरट्यास अटक; मौल्यवान ऐवज हस्तगत

रेल्वे पोलिसांची कामगिरी; पथकाला पाच हजारांचे बक्षीस जाहीर Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more