वेळसाव ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा


19th February 2018, 04:02 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

वास्को :  वेळसाव ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात अाली. यावेळी पंचायतीने मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली.

 ग्रामस्थांनी वकिलाच्या फीसाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी सूचना केली होती त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, असे सरपंच हेन्रिकस डिमेलो यांनी यावेळी 

सांगितले.

काही बांधकाम व्यावसायिकांकडून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्या विरोधात  उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती डिमेलो यांनी यावेळी दिली. 

किनारपट्टी वरील अतिक्रमणाबाबत रहिवाशी पंचायतीच्या निर्णयाला आव्हान देणार, असा इशारा ग्रामस्थ मॅक्सिमो डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

हेही वाचा