टी-२०त ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय


16th February 2018, 08:56 pm
टी-२०त ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

ऑकलंड :
येथील ईडन पार्कमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाचव्या टी-२० तीन देशांच्या मा​लिकेत ५ गड्यांनी पराभव करत विक्रमी विजयी नोंदवला. ऑस्ट्रेलियाने २४४ धावांचे लक्ष्य गाठत टी-२०तील सर्वांत मोठ्या विक्रमाची नोंद केली.
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलचे ४९ चेंडूत नोंदवलेले वादळी शतक व्यर्थ गेले. ऑस्ट्रेलियाने डी आरसी शॉर्टच्या ७६ व अॅरोन फिंचच्या नाबाद ३६ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडचा रोमहर्षक सामन्यात ७ चेंडू शिल्लक ठेवून पराभव केला.
टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. गुप्टिलने ४९ चेंडूत शतक ठोकले. त्याने ५४ चेंडूत सहा चौकार व ९ षटकार लगावत १०५ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत सहा बाद २४३ धावांचा डोंगर उभारला. मात्र न्यूझीलंडचे गोलंदाज या लक्ष्याचा बचाव करू शकले नाहीत. लक्ष्य कठीण होते मात्र ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत पाच गडी गमावत हे लक्ष्य गाठले. शॉर्टने ४४ चेंडूत ७६ धावांच्या खेळीत आठ चौकार व तीन षटकार लगावले तर फिंचने केवळ १४ चेंडूत तीन चौकार व तीन षटकार लगावत सामना सात चेंडू शिल्लक ठेवून जिंकवून दिला. फिंचने कोलिन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीत षटकार मारत विजयाची नोंद केली. शॉर्टला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.