ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ए​लिस पहिल्या स्थानावर

आयसीसीच्या क्रमवारीत मिथाली, हरमनप्रीतची घसरण

16th February 2018, 08:55 Hrs

दुबई :
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ए​लिस पेरीने भारतीय महिला संघाची कर्णधार मिथाली राजला मागे टाकत आयसीसीच्या महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावरील पेरीने पहिल्यांदाच आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग व मिथाली राज अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. पेरीने या आठवड्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटर ऑफ दी ईयरसाठी दुसऱ्यांदा बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला होता. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिथालीने लॅनिंगसोबत पहिले स्थान मिळवले होते. मिथालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ने विजय मिळवलेल्या सामननयात ४५, २० व ४ धावा केल्या होत्या.
हरमनप्रीतची घसरण
भारताची हरमनप्रीत कौर पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरली आहे तर स्मृती मंधाना १४ स्थानांची झेप घेत २१व्या क्रमांकावर पोहोचली आहे. स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत ८४, १३५, ० धावा करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेची मॅरिकोन कॅप पहिल्या तर भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.

Top News

मोपा विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू

१४ कुटुंबांना प्रत्येकी ८०० चौ.मी.जमीन Read more

सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली उपसमिती

ग्रेटर पणजी पीडीए; मागण्या ऐकून लवकरच निर्णय Read more

पर्यटनमंत्र्यांवर कारवाई करा : काँग्रेस

मोपा विमानतळाचे काम बंद पाडल्याचे प्रकरण Read more

आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे हाल : पणजीत येण्यासाठी प्रवाशांची पायपीट : पायलट, रिक्षा चालकांची मनमानी Read more