अनुष्का, लक्ष्मी, अनिनेश ठरले सुपर स्टार

करासवाडा येथे म्हापसा एलिट रोटरी क्लबतर्फे स्पर्धेचे आयोजन

15th February 2018, 03:07 Hrs


 प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : करासवाडा येथे म्हापसा एलिट रोटरी क्लबतर्फे आयोजित सुपर स्टार स्पर्धेत विविध गटांत अनुष्का मोरजकर, लक्ष्मी मोरजकर, अनिनेश सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

करासवाडा येथील रुस्टिक रोझ हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत १६ स्पर्धकांचा समावेश होता. १२ वर्षांखालील गटात अनुष्का मोरजकर हिला प्रथम, आकृती परब हिला दुसरे, १५ वर्षांखालील गटात लक्ष्मी मोरजकर हिला प्रथम,  सिद्धी पार्सेकर हिला दुसरे तर २० वर्षांखालील गटात अनिनेश सावंत याला प्रथम व संशिवा शिरोडकर हिला दुसरे पारितोषिक मिळाले. स्पर्धेचे परीक्षण उदय च्यारी, अनिल वेर्णेकर व विनय गावस यांनी 

केले.

 बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ‘गोवन वार्ता’चे मुख्य प्रतिनिधी तथा गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (गुज)  किशोर नाईक गावकर उपस्थित होते. तसेच यावेळी गौरीश धाेंड, अनिल लाड  

उपस्थित होते.   

गोमंतकीय मुला मुलींमध्ये बुध्दी कौशल्य आहे. परंतु ठरावीक वयानंतर मुले व मुली अशा स्पर्धांमध्ये भाग घेत नाहीत. वाढत्या वयातही मुलांनी अशा स्पर्धांनी भाग घेऊन आपले कौशल्य सादर करण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत  किशोर नाईक गावकर यांनी यावेळी व्यक्त केले. विजेत्यांना नाईक गावकर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.