मोपाचे बांधकाम ‘मेगावाईड’कडे

जीएमआरकडून वर्क ऑर्डर; मार्चपासून काम सुरू

15th February 2018, 03:05 Hrs

पांडुरंग गांवकर

गोवन वार्ता

पणजी : तुर्की आणि भारतातील दोन नामांकित कंपन्यांना मागे टाकत फिलिपाईन्सच्या मेगावाईड कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन कंपनीने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम कंत्राट मिळविले. आणखी उशीर होऊ नये म्हणून जीएमआर कंपनीने मेगावाईडला वर्क ऑर्डरही दिली आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून विमानतळाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे. २०२० मध्ये विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होईल.      

पात्रता निविदेच्या फेरीत फिलिपाईन्समधील मेगावाईड, तुर्कीतील लिमेक आणि भारतातील लार्सन अँड टुब्रो या कंपन्या पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर अंतिम निविदा प्रक्रिया सुरू होती. गृह मंत्रालयाकडून या तिन्ही कंपन्यांना ‘ना हरकत’ दाखला हवा होता. तो मिळविण्यासाठी उशीर लागल्याने ठराविक वेळेच्या सुमारे तीन महिने उशिराने कंत्राट देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिन्ही कंपन्या सक्षम होत्या, पण शेवटच्या निविदा प्रक्रियेत मेगावाईडने बाजी मारली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मेगावाईड कंपनी तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. हल्लीच जीएमआरने मेगावाईड कंपनीच्या सहाय्याने फिलिपाईन्समधील क्लार्क आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी निविदा भरली आहे.

‘मेगावाईड’ थेट बांधकामास मोकळी

  ३ हजार कोटी रुपये खर्चाच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी सुमारे १,९०० कोटी रुपये खर्च येणार आहे. 

  विमानतळ बांधकामासाठी जीएमआर कंपनीने एक्सिस बँकेकडून १,३०० कोटी रुपयांचे कर्जही मिळविले आहे. 

  बांधकामाचे उपकंत्राट देण्यात उशीर झाला असला, तरी विमानतळाची जागा तयार करणे, बांधकामे हटविणे अशी वेगवेगळी कामे या वेळेत पूर्ण झाली आहेत. त्यामुळे कंत्राट मिळालेली कंपनी थेट बांधकाम करण्यास मोकळी आहे.

Related news

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोग स्थापन करावा

कामगार नेते अजितसिंग राणे यांची मागणी Read more

थकीत भाडे : दुकानांना टाळे

वाळपई पालिकेची कारवाई : पंधरा दिवसानंतर जप्तीची कारवाई करणार Read more

दोन वर्षांत ३ हजार लोकांना नोकरी

अतारांकित प्रश्नाला कामगार मंत्र्यांचे लेखी उत्तर Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more