कोलव्यात दोन गटांत मारामारी

५ दुचाकी जाळल्या , एकास जखमी अवस्थेत इस्पितळात हालवले

14th February 2018, 09:04 Hrs


प्रतिनिधी | गोवनवार्ता 
मडगाव: बाणावली येथील कार्निव्हल महोत्सवादरम्यान एका महिलेचा विनयभंग केल्याच्या कारणावरून दोनगटांत मारामारी होऊन ५ दुचाकी जाळून टाकण्याची घटना मंगळवारी उशिरा घडली. कोलवा पोलिसांनी याप्रकरणी तीन प्रतिवादी तक्रारी नोंदवल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजू राऊतयांनी दिली. 
टोनीफर्नांडिस नामक तरुणाने गर्दीतउभ्या असलेल्या कोलवातील एका महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेसोबत आलेला तिचा पती वत्याच्या साथीदारांनी टोनी फर्नांडिस याला बेदम मारहाण केली.गंभीर जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले.

Related news

सोपटेंकडे जीटीडीसी सुपूर्द

नीलेश काब्राल यांचा राजीनामा, नूतन अध्यक्षांकडे दिला ताबा Read more

गोव्यातील खाणप्रश्न सोडवण्यासाठी संसदेत येणार विधेयक

मंत्री नीलेश काब्राल यांचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे स्पष्ट Read more

गोवा खाणप्रश्न ‘अॅटर्नी जनरल’ कार्यालयात अडकला

खाण शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि रवी शंकर प्रसाद यांची भेट Read more