सुदेश भोसलेंच्या गायनाने रसिक रंगले

14th February 2018, 03:15 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : पार्श्वगायक व मिमिक्री कलाकार सुदेश भोसले यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम नुकताच कला अकादमीच्या नाट्यगृहात पार पडला. स्वस्तिक पणजी या संस्थेने आयोजित या कार्यक्रमात सुदेश भोसलेंनी एकाहून एक सरस गाणी गाऊन रसिकांचे मनोरंजन केले. त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ऑर्केस्ट्रा मेलडी मेकर्स पुणे याने तेवढीच तोलामोलाची साथ केली. कल्याणी शेळके आणि अमोल यादव या पुण्यातील गायकांनी त्यांना साथ केली.            

सुदेश भोसले यांनी किशोर कुमार व स्वत: गायलेली हिंदी गाणी गाऊन धमाल केली.