पाळोळेतील मिरवणुकीला नागरिकांचा प्रतिसाद


14th February 2018, 03:13 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

काणकोण : काणकोणमधील तीन दिवसांच्या इंत्रुज महोत्सवात मंगळवारच्या अंतिम दिवशी पाळोळे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीत विदेशी नागरिकांसह हजारो लोकांनी भाग घेतला. युनायटेड पाळोळो ट्रस्टने आयोजित केलेल्या या मिरवणुकीत १२ चित्ररथ व वैयक्तिकपणे लोकांनी भाग घेतला होता.                  

रेंदेर, मच्छीमारी, पर्यावरण रक्षण याचे महत्त्व सांगणारे चित्ररथ मिरवणुकीत होते. गास्पर कुतिन्हो हे किंग मोमोच्या रुपात मिरवणुकीच्या अग्रस्थानी होते. पाळोळे क्लब हाऊसजवळ मिरवणुकीची सांगता झाली. तेथे बक्षीस वितरण करण्यात आले. पाळोळे समुद्र किनाऱ्यावर व्यवसाय करणाऱ्यांनी चित्ररथ तयार केले होते.                  

मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे तीन तास रात्री उशिरा पर्यंत मिरवणूक चालली होती. काणकोणमध्ये ही खासगी कार्निव्हल मिरवणूक काढण्याचे हे दुसरे वर्ष आहे. लोकांनी यंदाची ही मिरवणूक यशस्वी केल्याबद्दल पाळोळे युनायटेड ट्रस्टच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सायमन रिबेलो यांनी लोकांचे आभार मानले. नव्या पिढीला आमच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आम्ही कार्निव्हल  मिरवणुकीचे आयोजन करतो, असे त्यांनी 

सांगितले. 


हेही वाचा