शिक्षणात लवचिकता पाहिजे : पाठक


14th February 2018, 03:12 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : एखादी शैक्षणिक पदवी प्राप्त केल्यानंतर आपण शिकलो अशी आपण समजूत करुन घेतली आहे. परंतु, आयुष्यभरासाठी शिकणे महत्त्वाचे असते. याचा आपण विचार केलेला नसतो. आॅनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळवता येत असले तरीही समोरासमोरील संवाद महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे शिक्षणात लवचिकता आणण्यासाठी एकत्रित विचार केला पाहिजे, असे मत आयआयटी मुंबईमधील तज्ञ दीपक पाठक यांनी व्यक्त केले.                   

राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने, राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियान प्रकल्प संचनालयाच्या सहकार्याने शनिवारी संस्कृती भवनात ‘मास्टर्स क्लासेस’ या मालिकेअंतर्गत ‘शिक्षकांचे रुपांतर ; आजच्या डिजिटल शतकाची गंभीर गरज’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी पाठक बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.                   

लोलयेकर यांनी पाठक यांचे स्वागत केले. तर खात्याचे अतिरिक्त संचालक जेर्वासो मेंडिस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा