केवळ सिंचनासाठी कर्नाटकची धडपड

म्हादई जलतंटा लवादासमोर गोव्याचा युक्तिवाद

14th February 2018, 02:48 Hrs

खास प्रतिनिधी  | गोवन वार्ता   

पणजी : म्हादई जलतंटा लवादापुढे गोव्यातर्फे ज्येष्ठ वकील आत्माराम नाडकर्णी यांनी मंगळवारी आपला युक्तिवाद पुढे सुरू केला. कर्नाटकाकाच्या दाव्यातील फोलपणा त्यांनी सिद्ध करून दाखविला. कर्नाटकाने सादर केलेल्या साक्षीपुराव्यातील त्रुटी व खोटेपणा त्यांनी लवादाच्या नजरेस आणून दिला.      

मलप्रभा डीआरपीतील आकडेवारीनुसार कर्नाटक म्हादई नदीचे पाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी वळवू पाहात नसून निव्वळ सिंचनासाठी त्यांची ही धडपड चालल्याचे त्यांनी लवादाला सांगितले. कृष्णा जलतंटा लवादाने मलप्रभा प्रकल्पासाठी कर्नाटकला ४४ टीएमसी पाणी दिले होते. ते सर्व त्यांनी सिंचनासाठी वापरल्याचे त्यांनी लवादाला सांगितले.      

म्हादई नदीचे पाणी वळविल्यास गोव्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या भीषण परिणामांची अॅड. नाडकर्णी यांनी लवादाला कल्पना दिली. कावेरी जलतंटा प्रकणी दिलेल्या आदेशाचा भंग करण्याची कर्नाटकाला सवय आहे, ही सर्वोच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशे‌ऱ्यांची माहितीही त्यांनी लवादाला दिली. तामिळनाडूला पाणी सोडण्याचा आदेश दिला असतानाही त्याची पायमल्ली कर्नाटकाने केली, ही बाब त्यांनी लवादापुढे आणली. यावेळी कर्नाटकाच्या एका वकिलाचा तोल ढळला व लवादाचे न्यायमूर्ती मित्तल यांनी त्याना कडक समज दिली. कर्नाटकाचे ज्येष्ठ वकील अशोक देसाई यांनी त्याबद्दल लवादाकडे नंतर क्षमा मागितली. कर्नाटकाचा युक्तिवाद १५ फेब्रुवारीला होणार आहे      

Related news

बेताळभाटीत सामूहिक बलात्काराची तक्रार

पैशांच्या मागणीसाठी जोडप्याला धमकी; संशयितांचा शोध जारी Read more

पणजीत ४५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १८० कोटींचा खर्च

‘ईडीसी’चे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची माहिती Read more

धूम्रपानात घट; तंबाखू सेवनात मात्र टक्क्याने वाढ !

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ चा अहवाल Read more

Top News

बेताळभाटीत सामूहिक बलात्काराची तक्रार

पैशांच्या मागणीसाठी जोडप्याला धमकी; संशयितांचा शोध जारी Read more

सरदेसाईंची आपल्याच सरकारला धमकी हास्यास्पद

काँग्रेसकडून जोरदार टीका, अकार्यक्षमता उघड झाल्याचा आरोप Read more

धूम्रपानात घट; तंबाखू सेवनात मात्र टक्क्याने वाढ !

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ चा अहवाल Read more

दहावीतही मुलींची बाजी 

९१.२७ टक्के निकाल; ७८ शाळा शंभर टक्के Read more

राज्याचे आर्थिक नियोजन भक्कम

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांवरून प्रलंबित विषय निकालात; फोनवरून नियमित आढावा Read more

पणजीत ४५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १८० कोटींचा खर्च

‘ईडीसी’चे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची माहिती Read more