सिक्वेरा यांच्या पुतळ्यासाठी सत्ता सोडा

गिरीश चोडणकर यांचे गोवा फॉरवर्डला आव्हान

14th February 2018, 03:40 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता                  

पणजी : हल्लीच निर्माण केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएसाठी गोवा फॉरवर्डने डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचा विषय विकला, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोवा फॉरवर्ड आपल्या भूमिकेवर ठाम असल्यास पुतळ्याच्या विषयावरून त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हानही त्यांनी दिले.             

विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्यावरून तियात्र सुरू आहे. जनमत कौल दिनी मडगावात आयोजित जाहीर सभेत सिक्वेरा याचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर आम्ही कोणत्याही स्तराला जाणार असल्याचे गोवा फॉरवर्डने म्हटले होते. आता मात्र ग्रेटर पणजी पीडीएसाठी पुतळ्याचा विषय भाजपला विकला आहे. जनतेला गोवा फॉरवर्डचे हेच का गोंयकारपण, याचे उत्तर पक्षाने द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली. 

ग्रेटर पणजी पीडीए हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. गोंयकारपणाच्या नावाखाली रियल इस्टेटला जमिनी विकण्याचा सरकारचा डाव आहे. त्याचे सूत्रधार मनोहर पर्रीकर आहेत. ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद बाबूश मॉन्सेरात यांना दिले आहे. त्यांना यापूर्वी पर्रीकर यांनी घोटाळेबाज संबोधले होते. सर्व घोटाळेबाज भाजपछत्राखाली एक झाले आहेत, असेही गिरीश चोडणकर यांनी सांगितले.             

अापण भाटकारशाहीविरुद्ध जातीयवादी भाष्य केलेले नाही. भाजप माझ्याविरोधात हेमंत गोलतकर व दत्तप्रसाद नाईक यांना बोलायला लावते. ग्रेटर पणजी पीडीए करताना या बहुजन  नेत्यांची पर्रीकर यांना आठवण झाली नाही. स्वाभिमान असेल तर गोलतकर, नाईक यांनी भाजपचा राजीनामा द्यावा.

— गिरीश चोडणकर, 

सचिव, काँग्रेस

Related news

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोग स्थापन करावा

कामगार नेते अजितसिंग राणे यांची मागणी Read more

थकीत भाडे : दुकानांना टाळे

वाळपई पालिकेची कारवाई : पंधरा दिवसानंतर जप्तीची कारवाई करणार Read more

दोन वर्षांत ३ हजार लोकांना नोकरी

अतारांकित प्रश्नाला कामगार मंत्र्यांचे लेखी उत्तर Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more