शशिकलाताईंच्या पुतळ्यासाठी ठराव

मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्याकडून सादर


13th February 2018, 09:46 pm


विशेषप्रतिनिधी - गोवन वार्ता

पणजी : गोव्याच्यामाजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेत्या शशिकालाताई काकोडकर यांचा पुतळा विधानसभासंकुलात असावा अशी मागणी करणारा ठराव मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी विधानसभासचिवालयात दाखल केला आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्यापहिल्या शुक्रवारी पुतळ्यांचे ठराव कामकाजात घ्यायचे नाहीत असे सभापतींनीठरवल्यामुळे सध्या आलेले पाच ठराव कामकाजात येणार नाहीत. त्याविषयी अधिकृत घोषणासभापती विधानसभेत करतील.

दरम्यानविधानसभेच्या दुसऱ्या शुक्रवारसाठी ठराव स्विकारले जात असून सध्या प्रवीण झांट्येयांनी भाऊसाहेब बांदोडकरांच्या कन्या आणि गोव्याच्या माजी मुख्यमंत्री दिवंगतशशिकालाताई काकोडकर यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारावा यासाठी खासगी ठराव दाखलकेला आहे. सभापतींनी अशा प्रकारचे ठराव विधानसभा कामकाजात घ्यायचे नाही असे सध्याठरवले आहे मात्र त्याविषयी ते विधानसभेत घोषणा करतील

हेही वाचा