पंतप्रधानांनी मागितला खाणींसंबंधीचा अहवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान कार्यालयातून फोन; सर्व घटकांशी चर्चा करून घेणार अंतिम निर्णयः मुख्यमंत्री


13th February 2018, 08:54 pm
पंतप्रधानांनी मागितला खाणींसंबंधीचा अहवाल


विशेष प्रतिनिधी।गोवन वार्ता

पणजी : सर्वोच्चन्यायालयाने गोव्यात खाण बंदी लागू केल्यामुळे त्याच्या परिणामांची माहितीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने मागली आहे. राज्य सरकार लवकरच त्यांना याबाबतचाअहवाल पाठवणार आहे.

पणजी येथील एकाकार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान,  खाणव्याप्त भागातील आमदारांशी मुख्यमंत्री बुधवारी चर्चा करणार आहेत. त्याशिवाय खाणींशी संबंधित इतरसर्व घटकांशी मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत चर्चा करतील. गोवा फॉरवर्ड आणिकाँग्रेसने खाणींच्या लिलावाला विरोध केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कोणतानिर्णय घेते,  त्याकडेसर्वांचेच लक्ष आहे.

याविषयी बोलतानामुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, खाणव्याप्त भागातीलआमदार, खाण मालक, खाणीकडे संबंधित इतरघटकांशी चर्चा करून सरकार योग्य तो निर्णय घेईल. सध्या ऐकीवात असलेल्या बातम्या यावैयक्तिक मते आहेत. सरकारचा निर्णय सर्वांशी चर्चा केल्यानंतरच होईल.

हेही वाचा