ग्रेटर पणजी पीडीएसाठी विकला पुतळ्याचा विषय

गिरीश चोडणकर यांचा गोवा फॉरवर्डवर आरोप

13th February 2018, 06:52 Hrs

प्रतिनिधी: गोवनवार्ता

पणजी: हल्लीच स्थापित ग्रेटर पणजी पीडीए अन् अन्य चारफाईलींसाठी गोवा फॉरवर्डने डॉ. जॅक सिक्वेरा यांच्यापुतळ्याचा विषय विकल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी पणजीत घेतलेल्यापत्रकार परिषदेत केला. गोवा फॉरवर्ड आपल्या भूमिकेवर स्पष्ट असल्यास त्याने पुतळ्याच्या विषयावरून सरकारमधून बाहेर पडावे,  असेआवाहन त्यांनी केले.

जनमत कौल दिनीमडगावात आयोजित जाहीर सभेत सिक्वेरा याचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही तर आम्ही कोणत्याहीस्तरावर जाऊ शकतो, असे गोवा फॉरवर्डने स्पष्ट केले होते. त्यामुळेगोमंतकीय जनतेला गोवा फॉरवर्डनेस्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असेगिरीश चोडणकर यांनी सांगितले.

ग्रेटर पणजी पीडीएएक कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. गोंयकारपणाच्या नावाखाली रियल इस्टेट व्यावसायिकांना जमिनी विण्याचा सरकारचा डाव असून त्याचे सूत्रधार मनोहर पर्रीकर असल्याचा आरोप चोडणकर यांनीकेला. 

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more