डी. डी. कोसंबी विचार महोत्सव आजपासून

दिग्दर्शक मकरंद साठे यांचे व्याख्यान


13th February 2018, 03:32 am
डी. डी. कोसंबी विचार महोत्सव आजपासून

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : जागतिक कीर्तीच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना ऐकण्याची संधी देणारा डी. डी. कोसंबी विचार महोत्सव मंगळवारपासून सुरू होणार आहे. कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात संध्याकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, यात शुक्रवारपर्यंत (दि. १६) विविध विषयांवरील व्याख्याने होणार आहेत.

उद्घाटनानंतर ज्येष्ठ नाट्यलेखक तथा दिग्दर्शक मकरंद साठे यांचे ‘जागतिकीकरणाच्या काळात राष्ट्रीयता, संस्कृती आणि रंगभूमी’ या विषयावरील व्याख्यान होईल. १४ रोजी द स्टोरी ऑफ फाऊंडेशनच्या संचालक जया रामचंदानी यांचे ‘२१ व्या शतकात शिक्षणातील विरोधाभास’ या विषयावरील, १५ रोजी ब्रिटीश-भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलीमोरिया यांचे ‘ब्रेक्झिटच्या संदर्भातून भारत, ब्रिटन आणि युरोपियन युनियन, युनियनच्या भवितव्यावर पारसी दृष्टीक्षेप’, तर १६ रोजी भारतीय समकालीन चित्रकार आणि क्ष किरणतज्ज्ञ सुधीर पटवर्धन यांचे ‘आजची कला काय आहे’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. 

रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कला अकादमीतर्फे करण्यात आले 

आहे.

हेही वाचा