मासे विक्रेत्यांचे पालिका, पोलिसांना आव्हान

बायणातील प्रकार : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन फोल

13th February 2018, 03:59 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

वास्को : बायणातील ठिकठिकाणच्या रस्त्याच्या वळणावर अतिक्रमण करून मासे विक्री करणाऱ्या महिलांनी मुरगाव पालिका व पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या महिलांना रस्त्यावरून हटविण्यात येईल, असे आश्वासन मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक व मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी वारंवार दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्या मासे विक्रेत्यांना हटविण्याचा मुहूर्त त्यांना मिळालेला नाही.       

शहर भागातील रस्त्यावर अतिक्रमणे करून मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना हटविण्यासाठी मुरगाव पालिकेने वीस दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, बायणातील मासे विक्रेत्यांची रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुरगाव पालिका काय करणार आहे, हे अद्याप जाहीर झाले नाही. बायणामध्ये मासळी मार्केट आहे. त्या मार्केटात काही महिला मासे विकतात. परंतु, वळणावरील रस्त्यावर अतिक्रमणे करून तेथे मासे विक्री करणाऱ्या महिलांमुळे मार्केटातील महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यासंबंधी मुरगाव पालिका, वास्को पोलिस यांना निवेदने देऊन, विनंत्या करूनही काहीच कारवाई झालेली नाही. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या मासे विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासाठी बायणातील रहिवाशांनी सह्यांचे एक निवेदन दिले होते. मात्र, एक महिना उलटला तरी त्या

मासे विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याचा मुहूर्त पालिकेला मिळालेला नाही.

 संबंधित मासे विक्रेत्या महिला कोणालाही जुमानत नाही. यामुळे त्यांनी पालिका व पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे. 

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more