कोळसाप्रश्नी प्रतिवादी करण्याची गोवा फाऊंडेशनची मागणी

साऊथ वेस्ट पोर्टची याचिका, पर्यावरण मंत्रालयाचे उत्तर मंगळवारी शक्य

12th February 2018, 10:05 Hrs

मुरगाव बंदरातील कोळसाप्रश्नीसाऊथ वेस्ट पोर्टने दाखल केलेल्या याचिकेत आपल्याला प्रतिवादी करण्यात यावे, अशीयाचिका गोवा फाऊंडेशनने दाखल केली आहे. साऊथ वेस्ट पोर्ट सत्यस्थिती लपवत असल्याचागोवा फाऊंडेशनचा दावा आहे.

मुरगाव बंदरावर कोळसा हाताळणी प्रकल्पाच्याविस्तारासाठी केलेल्या अर्जाला पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात यावी यासाठीसाऊथ वेस्ट पोर्टने उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. याप्रकरणी पर्यावरणमंत्रालय आपले म्हणणे मंगळवारी मांडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आपल्यालाप्रतिवादी म्हणून संधी द्यावी, अशी गोवा फाऊंडेशनची याचिका आहे. जनतेच्याहितासाठीच संस्था या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचे क्लॉड आल्वारीस यांनी स्पष्टकेले आहे.

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more