पुतळ्यांचे खासगी ठराव कामकाजात नाही

राजकारण रंगण्याची चिन्हे, १९ पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन


12th February 2018, 06:52 pm
पुतळ्यांचे खासगी ठराव कामकाजात नाही

विशेष प्रतिनिधी। गोवनवार्ता
पणजी: १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजात पहिल्या शुक्रवारसाठी दिलेले खासगी ठरावकामकाजात घ्यायचे नाहीत, असे सभापतींनी ठरवलेआहे. त्यामुळे पुतळ्यांच्या राजकारणाला आता आणखी रंग चढण्याची शक्यता आहे.
विधानसभासंकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव आणि भाजपचे आमदार मायकल लोबोयांनी दोन खासगी ठराव दाखल केले होते.त्यानंतर डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारावा, असा खासगी ठराव दाखल केला होता. मगोने डॉ. राम मनोहर लोहिया आणि टी.बी. कुन्हा या स्वातंत्र्य सैनिकांच्यापुतळ्यांची उभारणी करण्याची मागणी करणारा खासगी ठराव दाखल केला होता. सभापती डॉ.प्रमोद सावंत यांनी सोमवारी हेसर्व खासगी ठराव फेटाळले,  त्यामुळे ते कामकाजात घेण्यात येणार नाहीत.आमदारांनी दिलेले इतर ठराव सभापतींनी स्वीकारलेआहेत.
गोवाफॉरवर्डने विधानसभेत जॅक सिक्वेरांचा पुतळा उभारण्याची मागणी केल्यानंतर तसे ठराव राष्ट्रवादी आणि भाजपच्याआमदारांनी दिले होते. त्यानंतर मगोने लोहिया आणि टी.बी.कुन्हा यांच्यापुतळ्यासाठी ठराव  सादर केला तर भाजपाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा ठराव सादर केला होता. आज सभापतींनी हे सारे ठरावच कामकाजात घ्यायचे नाही असेठरवल्यामुळे पुतळ्याचे राजकारण आता कुठले वळण घेते तेयेत्या काही दिवसात कळणार आहे.
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे नेतेविजय सरदेसाई यांना पुतळ्यांचा ठराव कामकाजात न घेण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असतात्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले.

हेही वाचा