बाबूश मोन्सेरात ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्ष

मुख्यमंत्री पर्रीकर, मडकईकर, जेनिफर सदस्यपदी

12th February 2018, 06:35 Hrs


विशेष प्रतिनिधी -गोवन वार्ता

पणजी : हल्लीचनिर्माण केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद शेवटी बाबूश मोन्सेरात यांनाच देण्यात आले आहे. पणजीचे आमदार म्हणून मुख्यमंत्री मनोहरपर्रीकर, कुंभारजुवेचे आमदार म्हणून वीज मंत्री पांडुरंगमडकईकर, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार टनी फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचीसदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

ग्रेटर पणजी नियोजनआणि विकास प्राधिकरणाच्या फाईलला सरकारची मंजुरी मिळाली असून मंगळवारपर्यंत अधिकृतआदेश निघेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णीलागली असून एकूण १७ सदस्यीय पीडीएवर पाच आमदार, पाच सरपंचांचासमावेश आहे. माजी वरिष्ठ नगर नियोजक पेद्रू कुतिन्हो यांनाही पीडीएवर स्थान मिळालेआहे. मारीयो फर्नांडि, राज मलीक, विवेक आंगले वअत्रेय सावंत यांची सदस्य म्हणून पीडीएवर नियुक्ती केली आहे.

ग्रेटर पणजीच्याक्षेत्रात येणाऱ्या ताळगाव,चिंबल, सांताक्रुझ, ओल्ड गोवा आणि कुडका-बांबोळी-ताळावली या पाच पंचायतीच्या सरपंचांची पीडीएवर सदस्य म्हणूननेमणूक केली आहे. नगर नियोजन अधिकारी या पीडीएचे सदस्य सचिव असतील.

दरम्यान, ग्रेटर पणजी पीडीएचे नियोजन क्षेत्र अधोरेखीतकेल्यानंतर काही दिवसांपूर्वी सरकारने पणजी आणि ताळगाव मतदारसंघ नियोजनक्षेत्रातून वेगवेगळे केले आहेत. अर्थात पणजी मतदारसंघाचे क्षेत्र ग्रेटर पणजीतूनपूर्णपणे वेगळे केले आहे.

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more