राज्यातील वाहतूक पहारेकऱ्यांना २.३० लाख रुपयांची बक्षिसे प्रदान

दुसऱ्या टप्प्यात कटारिया यांनी मिळवले ६९ हजार रुपये

10th February 2018, 05:18 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : सामाजिक कार्य करताना आर्थिक लाभ कशाप्रकारे मिळवता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोवा पोलिसांनी सुरू केलेली वाहतूक पहारेकरी (ट्रॅफिक सेंटीनेल)  योजना आहे. या योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात करंझाळे येथील आदित्य कटारिया यांनी ४० दिवसांत ६,९०० गुण मिळवून ६९ हजार रुपयांची कमाई करत अव्वल स्थान प्राप्त केले. यावेळी १७ वाहतूक पहारेकऱ्यांना मिळून २ लाख ३० हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

 कटारिया यांनी पहिल्या टप्प्यात १४ हजार रुपयांची कमाई केली असून त्यांनी पाठविलेले २५ हजार फोटो अजूनही प्रलंबित आहे. गोवा पोलिसांच्या सुरू केलेली ट्रॅफिक सेंटीनेल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २३ डिसेंबर २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ पर्यंत कालावधी होता. या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांना पोलिस महासंचालक डाॅ. मुक्तेश चंदर यांच्या हस्ते शुक्रवारी पणजी पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक दिनराज गोवेकर, उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले, दक्षिण गोवा वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, पोलिस निरीक्षक ब्रॅडन  डिसोझा, पोलिस निरीक्षक प्रदीप वेळीप व अन्य अधिकारी उपस्थित होते.             

दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दक्षिण गोव्यातील करमणे येथील दामोदर कुराडे यांनी मिळवले. त्यांना ५३ हजार रुपये मिळविले. या योजनेमुळे वाहतुकीत शिस्त येत असून अपघातात घट होत असल्याचे मत पोलिस महासंचालक डाॅ. मुक्तेश चंदर यांनी व्यक्त केले. या योजनेत व्यावसायिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा घेता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांनी पहारेकऱ्यांशी हुज्जत घातल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी चंदर यांनी दिला.  

आतापर्यंत १,५९५ पहारेकऱ्यांची नोंद

पोलिस खात्याने १० नोव्हेंबर रोजी वाहतूक पहारेकरी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत १,५९५ वाहतूक पहारेकऱ्यांने नोंद केली अाहे. तर वाहतूक नियम उल्लंघन केल्याबाबत १०, ८२४  वाहन चालकांना नोटीस जारी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more

Top News

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more