लोकमतचे संपादक राजू नायक यांच्याविरुद्ध तक्रार

09th February 2018, 05:07 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : लोकमत वृत्तपत्राने गेल्या रविवारच्या विशेष पुरवणीत ‘ख्रिस्ती जिहाद’ हा लेख प्रसिद्ध केला होता. या लेखात जातीयवादाचे तेढ निर्माण करण्याबरोबरच लोकांत धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केल्याने लोकमतचे संपादक राजू नायक यांच्याविरुद्ध गुन्हेगारीचे प्रसिद्ध वकील राजीव गोम्स व आकेंतील नागरिकांनी शहर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
लोकमतने गेल्या रविवारी विशेष पुरवणीत प्रसिद्ध केलेल्या लेखात धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करून चुकीची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आके भागातील लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यानुसार भा.दं.सं. च्या १५३ ए, २९५ ए व ५०५ (२) कलमांन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्याशी संपर्क साधला असता अॅड. राजीव गोम्स यांची तक्रार नोंद करून घेतली आहे. त्या तक्रारीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून विचारविनिमय करणे चालू आहे. तसेच आपण तक्रारीची प्रत पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्याकडे पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. गोम्स यांनी या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, पोलिस महानिरीक्षक व गोवा श्रमिक पत्रकार संघ यांना सादर यांना सादर केल्या आहेत.      

Top News

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more