सावईवेरे येथे अमलीपदार्थासह एकास अटक

संशयिताकडून १२० ग्रॅम गांजा जप्त; फोंडा पोलिसांची कारवाई


07th February 2018, 06:27 pm
सावईवेरे येथे अमलीपदार्थासह एकास अटक

 फोंडा पोलिसांनीअमलीपदार्थ प्रकरणी सावईवेरे बस स्थानकाजवळ छापा टाकून सुमारे २५ हजार रूपयांचेअमलीपदार्थ पकडले. याप्रकरणी रामचंद्र चव्हाण (३५, कुंडई) याला अटक करण्यात आली आहे. बस स्थानक परिसरात हासंशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  संशयिताकडून सुमारे १२० ग्रॅम गांजा जप्तकरण्यात आला. पुढील तपास फोंडा पोलिस करत आहेत.