लॅमिनेटेड आधार बिनकामाचे

क्यू आर कोड काम करणे होऊ शकते बंद


07th February 2018, 12:26 am

आधार कार्डला लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंग लावले असल्यास त्याआधारला काहीही अर्थ उरणार नाही. ते बिनकामाचे ठरणार असल्याचे आधार प्राधिकरणानेस्पष्ट केले आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा क्यूआर कोड काम करणे बंद होऊ शकते, किंवा यामुळे खासगी माहिती चोरली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळेच हा निर्णय आधार प्राधिकरणाने घेतला आहे. कागदावर छापण्यात आलेलेच आधारकार्ड योग्य आहे असे यूआयडीएचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी म्हटले आहे.