परीक्षेत उत्तीर्ण कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट, प्रशस्तिपत्र प्रदान


06th February 2018, 03:03 am

वार्ताहर। गोवन वार्ता

होंडा : गोवा स्कूल ऑफ फुल काॅन्टक्ट बिनो - रिव कराटे या संस्थेतर्फे हवेली कुर्टी फोंडा येथील काशिनाथ सभागृहात घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत होंडा सत्तरी, वेळगे, सांखळी, डिचोली, कुंकळे म्हार्दोळ, करमणे धारबांदोडा, काले, सांगे, या भागातील कराटेपटूनी यशस्वी कामगिरी करून ब्लॅक बेल्ट पदवी प्राप्त केली.            

कराटेपटूत स्वाती नाईक, सानिका कुकंळीकर, अनुष्का भगत, अवनी देसाई, आकांक्षा कालोजी, यश राजपूत, साहील कांदे, अथर्व एस, यश शेटये, रूत्वीक गावडे, चैतन्य तिवारी, विपंजित सिंग, विपूल नाईक, अनुराग गावडे, संकेत नाईक, संकल्प नाईक, मंथन कुंकळीकर, व आश्रय गावकर याना ब्लॅक बेल्ट प्रथम पदवी प्राप्त झाली. 

याचबरोबर साक्षी पेडणेकर, गुरूगंधा धामसेकर, गौरीशंकर घाडी, फटीश ठाकूर, पवन मिताडे, सुधांशू सालगुडी  यांना प्रथम कन्फर्म पदवी प्रदान करण्यात आली. तर संजीव गावकर व हनुमंत सावंत याना दुसरी कन्फर्म पदवी प्रदान करण्यात आली. सुरेखा कुंकळीकर व विशांत सोलयेकर याना तिसरी कन्फर्म पदवी देण्यात आली, तर सुदेश सावईकर याना चौथी कन्फर्म ब्लॅक बेल्ट पदवी देण्यात आली.            

उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंना हैदराबाद येथील कराटे ग्रॅण्डमास्टर एस. श्रीनिवासन यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट पदवी प्रमाणपत्र देण्यात आली. या कराटेपटूना कराटेचे मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक, सुदेश सावईकर, सुरेखा कुंकळीकर, विशांत सोलयेकर व संजीव गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.