तेजन फळारीचा ‘डबल धमाका’, लिडियालाही अजिंक्यपद


06th February 2018, 03:02 am

पणजी : तेजन फळारी व लिडिया बार्रेटोने अखिल गोवा राज्य बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. तेजनने दुहेरी अजिंक्यपद पटकावले तर मुलींच्या १९ वर्षांखालील एकेरी सामन्यात लिडियाने अंजना कुमारीचा पराभव केला. या स्पर्धेचे आयोजन बीपीएस स्पोर्टस् क्लबने गोवा बॅडमिंटन असोसिएशन व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने केले होते. तेजनने पुरुषांच्या एकेरीचे तर दुहेरीत त्याने ध्रुव आंगलेसोबत मिळून अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या १९ वर्षांखालील गटात अर्जुन फळारी, मुलींच्या १५ वर्षांखालील गटात सिया काकोडकर व मुलांच्या १५ वर्षांखालील गटात रुद्रा दुकळे यांनी विजय मिळवले.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत, बीपीएसचे अध्यक्ष संतोष जॉर्ज, खजिनदार अवधून कारो, जीबीएचे अधिकारी नरहर ठाकूर व संदीप हेबळे यांची उपस्थिती होती.